शनिवार, ७ जानेवारी, २०१२

माझी शेरोशायरी....शृंगार / 1


काय अर्पू मी तुला, सर्वस्व आहे अर्पिले
काय मागू तुजकडे, आहेस तूही अर्पिले

२.
काळजी मज वाटते, होईल ती आता मुकी
बोलण्याची संवय गळुनी, होईल ती आता मुकी
अर्थ याचा हा नव्हे, की बोलणे केले कमी
बोलणे जादाच होते, मात्र ते नजरेतुनी

३.
ओठातला शब्दार्थ मजला, पूर्ण नाही समजला
कोशाविना नजरेतला, भावार्थ अवघा समजला

४.
मागणी मी घालिता, मान तिने फिरविली
कामना माझ्या मनीची, सन्मुख ऎसी जाहली


चालणे पाहून तिचे, बोलू नका तिज पांगळी
गजगती माझ्या प्रियेची, आहेच एसी आगळी

६.
जवळ येता मी असा, दूर मजला सारिशी
दूर सोडुनि धावता, पदरास त्या तू खेचिसी
अंतरीचे द्वैत तुझिया, जाईल गे केचा कधी,
घट्ट मज कवटाळुनी, त्याच्यापरी घेशी कधी?

७.
रागावुनी पदरास त्या, थप्पड अशी मारू नको
समजून घे त्याला तरी, वेडे अशी कोपू नको

बुधवार, २८ डिसेंबर, २०११

माझी शेरोशायरी....शृंगार / 2

१.
दुनियेत अवघ्या मानितो, तुजलाच केवळ पूज्य मी
तुजविण बाकी मानितो, गणितातले ते ‘पूज्य’ मी

२.
रातही बेधुंद आहे, चंद्रही बेधुंदही
धुंद ऎशा मीलनाला, रातराणी गंधही

३.
पौर्णिमेची रात ही, नुसतीच नाही रात ही
चंद्र आणि रात यांच्या, मीलनाची रात ही
रात आहे पेटली अन चंद्रही आहे तसा
पेट तो ऎसाच की, सूर्यही नाही तसा
दीर्घ विरहां साहुनी, जवळ येती आज ती
एकमेकां खुलविती अन एकमेकां शमविती

४.
घे जरा सबुरीत हलके, जाग येइल या जनां
नूपुरांना, पैंजणांना, कंठ फुटतो साजना

सोमवार, २६ डिसेंबर, २०११

माझी शेरोशायरी....शृंगार / 3

१.
घट्ट तुज कवटाळुनी, नित्य तो आलिंगितो
खास अमुचा हक्क तो, पदर तव बळकावितो
मांडिली तकरार मी, तुजपुढे अगणितदा
हाय! तू अन्याय केला, मजवरी प्रत्येकदा

२.
केस कुरळे भुरभुरे. अजवरि सांभाळले
आज ‘डयूटी’ वाढली, पदरास त्या सांभाळणे

३.
बागेत या येऊनही, गुलाब नाही श्वासिले
पुष्पाळ या बागेमधी, निश्वास केवळ श्वासिले

४.
वीणेतल्या ज्यांच्या कधी, ताराच ना झंकारल्या
वीणेतल्या त्यांच्या अशा, नुसत्याच तारा राहिल्या

५.
डोळ्यास नाही भेटले, ओठास नाही भेटले
नाहीच कोणी भेटले, कोणास कोणी भेटले

गुरुवार, २२ डिसेंबर, २०११

माझी शेरोशायरी....शृंगार / 4


काय अर्पू मी तुला, सर्वस्व आहे अर्पिले
काय मागू तुजकडे, आहेस तूही अर्पिले

२.
काळजी मज वाटते, होईल ती आता मुकी
बोलण्याची संवय गळुनी, होईल ती आता मुकी
अर्थ याचा हा नव्हे, की बोलणे केले कमी
बोलणे जादाच होते, मात्र ते नजरेतुनी

३.
ओठातला शब्दार्थ मजला, पूर्ण नाही समजला
कोशाविना नजरेतला, भावार्थ अवघा समजला

४.
मागणी मी घालिता, मान तिने फिरविली
कामना माझ्या मनीची, सन्मुख ऎसी जाहली


चालणे पाहून तिचे, बोलू नका तिज पांगळी
गजगती माझ्या प्रियेची, आहेच एसी आगळी

६.
जवळ येता मी असा, दूर मजला सारिशी
दूर सोडुनि धावता, पदरास त्या तू खेचिसी
अंतरीचे द्वैत तुझिया, जाईल गे केचा कधी,
घट्ट मज कवटाळुनी, त्याच्यापरी घेशी कधी?

७.
रागावुनी पदरास त्या, थप्पड अशी मारू नको
समजून घे त्याला तरी, वेडे अशी कोपू नको

बुधवार, २१ डिसेंबर, २०११

माझी शेरोशायरी....विनोद / 1

१.
आमुच्या मांडीवरी, बाळ आहे बैसला
नंदपत्नीच्या जसा, कृष्ण होता बैसला
बाळमुखी त्याचिया, विश्व तिने पाहिले
बाळमुखीं, हाय! आम्ही, दात किडके पाहिले

२.
पहिलीस मुलगा जाहला, ती जाहली वेडीखुळी
दुसरीस मुलगा जाहला, आधीच होती ती खुळी

३.
पंचांग अवघे पिंजुनी, सुमुहूर्त आम्ही पाहिले
हाय! आता ना कळे, कोण्या मुहूर्तीं पाहिले

४. मांजरीला पाहुनी, तो म्हणाला- ‘शू:! हुशा!’
थबकली आनंदुनी, समजुनी ती- ‘शू:! उषा!’

५.
‘सावळ्या केसात आहे तारुण्य-’ ऎसे वाचुनी
‘पांढ~या केसात आहे-’ ऎसेहि पुढती वाचुनी
चमकलो आम्ही जरासे, आश्चर्य थोडे वाटले
नुसतेच ना आश्चर्य थोडे, वाईटसुद्धा वाटले-
तारुण्य ना आम्हाकडे, वार्धक्यही नाही तसे
डोईवरि या आमुच्या, टक्कल आहे –हे असे!
तरुण ना म्हणणार कोणी आम्हास, आहे हे खरे
वृद्धही तैसेच कोणी म्हणणार ना, हेही खरे!

६.
आज आहे नाभिकाचा, मस्त धंदा चालला
पुरुषांसवे स्त्रियाहि आता, केस कापू लागल्या
पाहतो नाभिक आता, शुभदिनाची वाट त्या-
पुरुषांसवे दाढी कराया, केव्हा आता येतील त्या?

७.
संवय होती खूप पुराणी, घ्यावयाचा ‘इव्हनिंग वाक”
आणिला टी. व्ही. घरी अन संवय गेली जळून खाक!!

(रोहिणी-पुणे/सप्टेंबर/ १९८७)

मंगळवार, २० डिसेंबर, २०११

माझी शेरोशायरी....विनोद / 2

१.
एकलव्या, आमचे गुरु कसलीच ना घे ‘दक्षिणा’
कसलीच ना गुरुदक्षिणा,( बाकी काहीच ना ते दे आम्हा!)

२.
रामाहुनी-कृष्णाहुनी, भाग्य आमुचे मानितो
बुद्धाहुनी, येशूहुनीही, भाग्य मोठे मानितो
ही पहा, ही साक्ष-अथवा घ्या पुरावा बख्खळ-
सांगा बरे देवास कोण्या, डोईस आहे टक्कल?

३.
पातळांची पेठ आता ठप्प आहे जाहली
पँटची सर्वत्र आता, लागण आहे लागली

४.
औषषे घेऊन झाली पेशंटची ‘Expiry ’
तेव्हा कुठे लक्षात आली ‘Date of Expiry’

५.
काय कैसे कोण जाणे, बदल मोठा जाहला
बदल तो त्याच्यात, ‘तो’ चा ‘ती’ च होऊन बैसला
सर्वजन आश्चर्यले, दु:खही बहु जाहले-
संतोष होता हाच, त्याचे लग्न नव्हते जाहली

६.
तानपुरा घेउनी. गावया ती लागली
गर्दभांची तोच मोठी, रांग दारी लागली
रांग होती लागली, नुसतीच ना ऎकावया
रांग होती लागली, बांधून ‘गंडा’ घ्यावया

७.
वस्तीत होऊ लागल्या, चो~याच चो~या चहुकडे
म्हणुन कुत्री पाळिली, सर्वत्र आम्ही चहुकडे
वाटेल चोरां, वाटले, धाक कुत्र्यांचा आता
हाय! होऊ लागली, कुत्रीच सारी नापता

८.
राग माझ्या प्रेयसीचा, आहेच ऎसा आगळा
पाहिले रागात आणि, चष्माच माझा तडकला..

(रोहिणी-पुणे/सप्टेंबर/१९८७)