मंगळवार, २० डिसेंबर, २०११

माझी शेरोशायरी....विनोद / 2

१.
एकलव्या, आमचे गुरु कसलीच ना घे ‘दक्षिणा’
कसलीच ना गुरुदक्षिणा,( बाकी काहीच ना ते दे आम्हा!)

२.
रामाहुनी-कृष्णाहुनी, भाग्य आमुचे मानितो
बुद्धाहुनी, येशूहुनीही, भाग्य मोठे मानितो
ही पहा, ही साक्ष-अथवा घ्या पुरावा बख्खळ-
सांगा बरे देवास कोण्या, डोईस आहे टक्कल?

३.
पातळांची पेठ आता ठप्प आहे जाहली
पँटची सर्वत्र आता, लागण आहे लागली

४.
औषषे घेऊन झाली पेशंटची ‘Expiry ’
तेव्हा कुठे लक्षात आली ‘Date of Expiry’

५.
काय कैसे कोण जाणे, बदल मोठा जाहला
बदल तो त्याच्यात, ‘तो’ चा ‘ती’ च होऊन बैसला
सर्वजन आश्चर्यले, दु:खही बहु जाहले-
संतोष होता हाच, त्याचे लग्न नव्हते जाहली

६.
तानपुरा घेउनी. गावया ती लागली
गर्दभांची तोच मोठी, रांग दारी लागली
रांग होती लागली, नुसतीच ना ऎकावया
रांग होती लागली, बांधून ‘गंडा’ घ्यावया

७.
वस्तीत होऊ लागल्या, चो~याच चो~या चहुकडे
म्हणुन कुत्री पाळिली, सर्वत्र आम्ही चहुकडे
वाटेल चोरां, वाटले, धाक कुत्र्यांचा आता
हाय! होऊ लागली, कुत्रीच सारी नापता

८.
राग माझ्या प्रेयसीचा, आहेच ऎसा आगळा
पाहिले रागात आणि, चष्माच माझा तडकला..

(रोहिणी-पुणे/सप्टेंबर/१९८७)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा