बुधवार, २८ डिसेंबर, २०११

माझी शेरोशायरी....शृंगार / 2

१.
दुनियेत अवघ्या मानितो, तुजलाच केवळ पूज्य मी
तुजविण बाकी मानितो, गणितातले ते ‘पूज्य’ मी

२.
रातही बेधुंद आहे, चंद्रही बेधुंदही
धुंद ऎशा मीलनाला, रातराणी गंधही

३.
पौर्णिमेची रात ही, नुसतीच नाही रात ही
चंद्र आणि रात यांच्या, मीलनाची रात ही
रात आहे पेटली अन चंद्रही आहे तसा
पेट तो ऎसाच की, सूर्यही नाही तसा
दीर्घ विरहां साहुनी, जवळ येती आज ती
एकमेकां खुलविती अन एकमेकां शमविती

४.
घे जरा सबुरीत हलके, जाग येइल या जनां
नूपुरांना, पैंजणांना, कंठ फुटतो साजना

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा