गुरुवार, २२ डिसेंबर, २०११

माझी शेरोशायरी....शृंगार / 4


काय अर्पू मी तुला, सर्वस्व आहे अर्पिले
काय मागू तुजकडे, आहेस तूही अर्पिले

२.
काळजी मज वाटते, होईल ती आता मुकी
बोलण्याची संवय गळुनी, होईल ती आता मुकी
अर्थ याचा हा नव्हे, की बोलणे केले कमी
बोलणे जादाच होते, मात्र ते नजरेतुनी

३.
ओठातला शब्दार्थ मजला, पूर्ण नाही समजला
कोशाविना नजरेतला, भावार्थ अवघा समजला

४.
मागणी मी घालिता, मान तिने फिरविली
कामना माझ्या मनीची, सन्मुख ऎसी जाहली


चालणे पाहून तिचे, बोलू नका तिज पांगळी
गजगती माझ्या प्रियेची, आहेच एसी आगळी

६.
जवळ येता मी असा, दूर मजला सारिशी
दूर सोडुनि धावता, पदरास त्या तू खेचिसी
अंतरीचे द्वैत तुझिया, जाईल गे केचा कधी,
घट्ट मज कवटाळुनी, त्याच्यापरी घेशी कधी?

७.
रागावुनी पदरास त्या, थप्पड अशी मारू नको
समजून घे त्याला तरी, वेडे अशी कोपू नको

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा